बातम्या

संगमरत्न फाउंडेशन (NGO) वतीने मुंबई दादर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन.

मुंबई/नरेश मोरे:
माणसाशी रक्ताचे नाते जोडणारे असे रक्तदान हे श्रेष्ठदान सुद्धा समजले जाते.मुंबई शहरातील दादर येथे संगमरत्न फाउंडेशन (NGO) महाराष्ट्र राज्य समुहातर्फे येत्या रविवार दिनांक.२१ जुलै २०२४ रोजी रक्तदान ‘के.ई.एम रुग्णालय परळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे. रक्तदान करण्यासाठी इच्छुक व्यक्तीनी मुंबई पब्लिक स्कूल (बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा) कबुतर खाना जवळ,भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम)मुंबई-४०००२८’ येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेमध्ये येऊन रक्तदान करू शकतात.
संगमरत्न फाउंडेशन ग्रुपद्वारे ‘आनंदाने देऊया समाजाचं देणं ‘ या घोषवाक्याद्वारे सामाजिक, शैक्षणिक,कला, पर्यटन या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हे आयोजित केलेले रक्तदान शिबिर. ‘समाजसेवेचे भान, रक्तदान श्रेष्ठदान’ हे या रक्तदान शिबिराचे ब्रीदवाक्य आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवदान मिळते. आपण केलेला रक्तादानाचा फायदा समोरच्याचा चेहऱ्यावरचा आनंद बनू शकतो. त्यामुळे आपण रक्तदानासाठी येताना आपल्याबरोबर आपल्या मित्रांना, नातेवाईकांना घेऊन यावे असे आवाहन संगमरत्न फाउंडेशन (NGO ) समूह मार्फत केले जात आहे.
रक्तदान करणाऱ्या सदस्यांना २ प्रमाणपत्र,बॅज, चहा,बिस्कीट,अल्पोपहार देण्यात येईल.अधिक माहितीसाठी संगमरत्न फाउंडेशन टीम अल्पेश सोलकर – ८६५२७८४५४७, तेजस्वी जावकर ८२९१६६०१९४ , अतुल करपे ९६१९०४५८६५ ,प्रशांत ९९२०८६४६०९ यांच्याशी संपर्क करू साधा. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!