बातम्या

पत्रकार उत्कर्ष समिती पुरस्कृत महिला उत्कर्ष समितीच्या लेकींनी बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी राज्यभरात दिले पोलिसांना निवेदन….

नवी मुबई :- (प्रमोद तरळ) बेलापूर येथील विवाहिता अक्षता म्हात्रे या ३० वर्षीय महिलेचे पती आणि सासू सोबत भांडण झाले म्हणून ती घरातून निघून कल्याण जवळील शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिरामध्ये गेली. त्यावेळी रात्री मंदिरात एकटी असलेल्या अक्षताला मंदिरातील तिघा सेवेकऱ्यांनी भांगेच्या गोळ्या असलेला चहा पिण्यासाठी दिला होता.
ज्यामुळे नशेमध्ये असलेल्या अक्षतावर तीनही आरोपींनी मंदिरातच आळीपाळीने जबरी बलात्कार केला. काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या अक्षताने आरडाओरड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी अक्षताला मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अतिशय संताप जनक व राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तसेच महिलांची सुरक्षा ऐरणीवर टांगणारा हा प्रकार असून त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.
अशा नराधम नीच प्रवृत्तीच्या मानसिकतेला लगाम बसावा तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तर प्रदेश कार्याध्यक्ष सौ. श्रुती उरणकर, प्रदेश सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे , नवी मुंबई अध्यक्ष सौ सुजाता दिनेश कडू , कार्याध्यक्ष सौ वर्षा लोकरे, प्रदेश संघटक सौ. निता माळी , उपाध्यक्ष सौ आरती पाटील, कोकण अध्यक्ष सौ ज्योतीका हरयान , पुणे अध्यक्ष सौ. ज्योती गायकवाड, सदस्य सौ रश्मी रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ दीपा ताटे , अकोला अध्यक्ष सौ सुनीता इंगळे , तुर्भे अध्यक्ष सौ वंदना अंबवले सदस्या सौ. श्वेता तांडेल यांनी आपापल्या सहकारी सदस्यांसह राज्यभर पोलिसांना निवेदन दिले.
महिला उत्कर्ष समितीने दिलेल्या या निवेदनात पोलीस प्रशासनाकडे अशी मागणी केली की जरी गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली असली तरी हा खटला जलदगती कोर्टात चालवून दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्यांना फासावर लटकवण्यात यावे ज्यामुळे समाजात अशा घटना करण्यास कोणी धजावणार नाही तसेच कायद्याची जरब राहील.
महिला उत्कर्ष समितीच्या या निवेदनाची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून तपास अधिक जलद गतीने करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!