लेख

विशेष लेख.. अनाथांचा नाथ – ऋषीनाथ.

अनाथाचा नाथ – ऋषिनाथ समाजकारणात येताना काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचा सहवास नेहमी प्रेरणादायी आणि हवाहवासा वाटतो. त्यांच्या साथीने प्रवास करताना हक्काचा आणि मायेचा आधार वाटतो. असाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबातील मानून जनसामान्यांची सेवा करण्याचे बळ देणारा, सर्वसामान्यांचा आधारवड म्हणजे ऋषीनाथदादा पत्त्याणे . लांजा तालुक्यातील वाघ्रट गावाचे सुपुत्र असणाऱ्या ऋषीनाथदादा पत्याणे आणि कुटुंबीयांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्यांच्या रूपाने पंचक्रोशीतील अनाथ मंडळीना आपल्या हक्काचा नाथ मिळाला आहे. कोरोना काळात प्रकर्षाने त्याची प्रचिती आली. अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून मिळालेल्या जीवनावश्यक वस्तूंचे ठिक -ठिकाणी गरजूंना वाटप करण्यात येत असतानाच लांजा तालुक्यात सर्वसामान्य कुटुंबाना मदतीचा हात देण्यात पुढाकार घेतला तो प्रामुख्याने स्वराज्य प्रतिष्ठान लांजा यांनी. प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय ऋषीनाथ दादा पत्त्याणे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून तसेच भक्कम पाठिंब्यातून निर्माण झालेल्या स्वराज्य प्रतिष्ठान लांजाने कोरोना काळात तालुक्याच्या पश्चिम विभागात, डोंगराळ भागात वाडी -वस्त्यांवर विसावलेल्या गोरगरीब जनतेला मोठा आधार दिला. स्वराज्य प्रतिष्ठान लांजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शासनाने कडक लॉकडाऊन केले असल्याने ग्रामीण भागातील जनतेला, हातावर पोट असलेल्या मजुरांना घराबाहेर पडणे अशक्य झाले होते. हाताला काम नाही त्यामुळे घरात दाम नाही साहजिकच जीवनात राम नाही, अशा मानसिकतेत गुरफटलेल्या दऱ्याखोऱ्यातील जनतेला दादांनी मदतीचा हात दिला. साहजिकच ऐन टप्प्यात मदतीचा ओघ ओसरलेला असताना अनेक गोरगरीब लोंकाच्या चुली त्यामुळे धगधगत्या राहिल्या. कसोटीच्या काळात ग्रामीण भागातील लोकांना खऱ्या अर्थाने अनेक समस्यांचा सामना करावा लागत असताना त्यांना आर्थिक साहाय्यासोबतच मानसिक आधार देण्याचे काम स्वराज्य प्रतिष्ठान लांजा चे संस्थापक ऋषी नाथदादा पत्याणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर आणि सहकाऱ्यांनी केले.

जाहिरात…
दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)

लांजा तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयापासून ते अगदी पश्चिमेकडील सापुचेतळे, खानवली आदी भागात जंतुनाशक फवारणी केली. कडेकपारीत वसलेल्या गोरगरीब, ग्रामीण, गरजू लोकांना भेटी देऊन जीवनावश्यक साहित्य पोहोच केले. आर्सेनिक अल्बम च्या गोळ्या मोफत वाटल्या. औषधोपचारासाठी मेडिकल किट उपलब्ध करून दिले. त्यामुळे लोकांना स्वराज्य प्रतिष्ठान आणि त्याचे पदाधिकारी आपले वाटू लागले आहेत. खरं तर लांजा तालुकाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना दिशा देणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ऋषीनाथदादा पत्त्याणे सुपरिचित आहेत. त्यांच्याच माध्यमातून परिसरातील सर्वसामान्य कुटुंबांचा उत्कर्ष व्हावा, नव्या पिढीला दिशा मिळावी या हेतूने 1 जानेवारी 2012 रोजी स्वराज्य प्रतिष्ठान ची स्थापना झाली . रत्नागिरी जिल्ह्यात कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य या क्षेत्रात तरुणांनी सक्षम व्हावे याकरिता स्वराज्य प्रतिष्ठानची धुरा अध्यक्ष विनायक खानविलकर यांच्याकडे सोपवली. प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनच नव्हे तर आर्थिक सहकार्याची बळकटी दिली. स्थापनेपासूनच प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य आदि विविध क्षेत्रात ग्रामस्थांना मदत करावी, गोरगरिबांना सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बसस्थानके, रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी आदि क्षेत्रात मदत करणे हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे.आपल्या उद्दिष्टांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न ऋषिनाथ दादा पत्त्याणे, त्यांचा परिवार आणि स्वराज्य प्रतिष्ठान च्या प्रत्येक कार्यकर्त्याने आजपावेतो केला आहे. जीवन गाणे गातच रहावे असे म्हणणे सोपे असले तरी प्रत्यक्ष ते खूप कठीण आहे. कुटुंबातील वयोवृद्ध माणसे, त्याचबरोबर विविध वृद्धाश्रमातील सदस्य यांची कुटुंबातील सदस्यांकडून योग्य दखल न घेतली गेल्यास त्यांच्यात चिडचिड, एकाकीपणा, नैराश्य आदी नकारात्मक भावना वाढीस लागू शकतात.

जाहिरात..

वैफल्यग्रस्ततेतून कौटुंबिक हिंसाचार वाढू शकतो, यांचा विचार करून स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऋषीनाथदादा पत्त्याणे यांनी वेगळा दृष्टिकोन ठेवून वृद्धाश्रम तसेच गावागावातील असहाय्य, निराधार वृद्ध व्यक्तींना भेट देऊन तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे वेळोवेळी वाटप करून त्यांना मायेचा आधार देत आहेत . शिवाय त्यांच्या जगण्याच्या आशा जिवंत ठेवण्यातही मोलाची भूमिका बजावत आहेत. आज दिवाळीच्या पूर्व संध्येला वृद्धाश्रम पावस येथे आयोजित कार्यक्रम त्याचेच द्योतक आहे. मी आणि माझे असे चाकोरीबद्ध जीवन जगण्याची मनिषा बाळगताना अनेक ठिकाणी माणुसकी नष्ट होत आहे. स्वराज्य प्रतिष्ठान लांजाने मात्र माणुसकी जपण्याचा वसा घेतला आहे. त्याचे सारे श्रेय संस्थापक ऋषीनाथ दादा पत्त्याणे यांच्याकडे जाते. ‘जीवनाच्या सायंकाळी
कधी न व्हावे उदासवाणे |हर्षभराने गात बसावे
जीवन गाणे | ‘
या ओळींप्रमाणे सर्वसामान्य, गोरगरीब, अनाथ व्यक्तींच्या जीवनात आनंद यावा, यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिनाथ दादा पत्त्याणे यांनी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर, उपाध्यक्ष डी. डी. कुर्धेकर, सौ . स्मिता ऋषिनाथ पत्याणे , ज्येष्ठ मार्गदर्शिका प्रणिता ताई पत्याणे- बोरकर , अरविंद पत्याणे ,प्रमिल पत्त्याणे, सुनील पत्त्याणे, नितीश पत्याणे, पायल पत्याणे, सचिन पत्याणे , महेंद्र शेलार ,विजय साळुंखे ,संतोष पत्याणे,सरपंच इलीयाज बंद्री , सचिव आलीम काझी, ,विनोद सावंत, प्रवीण मेस्त्री ,सूर्यकांत बने, समीर सावंतदेसाई, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक मार्गदर्शक सुहास वाडेकर या सर्वांना सातत्याने प्रेरणा दिली, आर्थिक हातभार दिला. त्यामुळेच लांजा तालुक्याच्या ग्रामीण, डोंगराळ भागात भरीव कार्य करणे शक्य झाल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी दिली. त्यातूनच आनंदाची उबदार किरणे दूरदूर पर्यंत पोहोचविण्याचे काम स्वराज्य प्रतिष्ठान लांजाच्या वतीने दमदारपणे सुरू आहे. अर्थात त्याचे सर्व श्रेय जाते ते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऋषीनाथदादा पत्त्याणे आणि त्यांच्या परिवाराकडे. उच्चशिक्षण घेऊन मुंबईसारख्या मायानगरीत स्थिरावलेल्या ऋषीनाथदादा पत्याणे स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदि क्षेत्रात पंचक्रोशीला दिलेलला मदतीचा हात निश्चितच अविस्मरणीय आहे. माहिती संकलन – सुहास वाडेकर
अध्यक्ष – विनायक खानविलकर

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!