बातम्या

म्हसळा नगर पंचायत हद्दीत १ कोटीच्या विकास कामांचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

रायगड : म्हसळा शहराचा विकास हाच आपला ध्यास घेऊन म्हसळा नगर पंचायत हद्दीत मागील सहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातुन खासदार सुनिल तटकरे,आमदार आदिती तटकरे यांनी विकासाची गंगा आणत सर्वांगीण विकास साधला आहे.नव्याने म्हसळा शहरातील विविध विकास कामांचे आराखड्यातील रस्ते विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या १ कोटी रुपये खर्चाचे ६ कामांचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. विकास कामांमध्ये प्रामुख्याने १) जाविद फणसे यांच्या घरापासून इस्माइल मेमन यांचे घरापर्यंत रस्ता तयार करणे अंदाजपत्रकिय रक्कम रुपये ७५६०००/- लक्ष २) नासीर हळदे ते जामा मज्जिद गेट पर्यंत रस्ता तयार करणे रक्कम रुपये १६३५६०२/- लक्ष ३) भाजी गल्ली ते अब्दुल काझी यांचे घरापर्यंत रस्ता करणे रक्कम रूपये २६९६०३४/- लक्ष ४) पी. बी.सावंत यांचे दुकान ते जानसई नदी पर्यंत गटार व रस्ता तयार करणे रक्कम रूपये १३१४६८७/- लक्ष ५) मुब्बशीर जमादार ते मंजुर उकये घरा पर्यंत रस्ता तयार करणे रक्कम रूपये ८७२३८९ /- लक्ष ६) पोलिस ठाणे म्हसळा ते जानसई नदीकडे जाणारा रस्ता तयार करणे भाग २,रक्कम रुपये ४९७१३३२/- लक्ष असे एकुण सहा कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष समीर बनकर,नगराध्यक्ष असहल कादीरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे,गट नेते संजय कर्णिक,शाहीद उकये,काँग्रेस पक्ष प्रमुख फझल हळदे, सलाम हळदे, रफिक घरटकर,शकुर हूर्जूक, नगरसेवक नासीर मिठागरे, अनिकेत पानसरे, संजय कर्णिक, करण गायकवाड, नगरसेविका सरोज म्हशिलकर,नौसिन चोगले, सभापती सूमैया आमदनी, वृषाली घोसाळकर, नईम दळवी, वसीम कोदरे, अबु उकये, बाबा हर्जुक, सलीम चोगले आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!