बातम्या

तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत.. – श्री ऋषिनाथ दादा पत्याणे

प्रतिनिधी : विनायक खानविलकर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिकडे तिकडे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने आणि आनंदाने शिवजयंती साजरी करत असताना कुठेतरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी केलेले संस्कार विसरतोय का ? बहुतांश ठिकाणी रस्त्यावर धंदा करणारे फेरीवाले , पान टपरीवाले , दुकानदार , रस्त्यावर फिरणारे गाडीवाले यांच्याकडून वर्गण्या जमा करून दुसऱ्या मंडळापेक्षा आपली शिवजयंती कशी चांगली होईल, याकडे तरुण वर्गाचं लक्ष लागलेलं असतं . यापेक्षा शिवजयंतीच्या दिवशी लोक उपयोगी उपक्रम राबवत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर , अनाथाश्रम सेवा , वृद्धाश्रम सेवा , शैक्षणिक साहित्याचं वाटप असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबविले तर महाराजांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र घडायला फारसा वेळ लागणार नाही . गेली अनेक वर्षे स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेचे सन्मानिय अध्यक्ष विनायक खानविलकर आणि या संस्थेचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून कै.दाजी पत्याणे यांच्या आशीर्वादाने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. येत्या काही कालावधीमध्ये जिल्ह्यातील तरुण वर्ग नोकरीच्या पाठीमागे न लागता उद्योगधंद्यामध्ये यावा यासाठी उद्योग मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत .
दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!