लेख

सून द्रोपदी शस्त्र उठाओ अब यहा गोविंद ना आयेंगे.. (लेखन : हर्ष सुरेंद्र नागवेकर रत्नागिरी..)

द्रोपदी आज 21 व्या शतकातून तुझ्यासाठी आवर्जून लिहावंसं वाटतं. कारण, तू गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये आज एक नवी द्रोपदी दिसते. वडील तुझा द्वेष करत असून सुद्धा, वडिलांना प्रथम पूज्य मानणारी तू. त्या महान राजाची एक आज्ञाधारी आणि शूर मुलगी. स्वयंवर तुझा अगदी भव्य झाला म्हणे. पण त्यावेळेस धनुष्य इतर कोणी उचलू शकले नव्हते, यात त्यांची कमी होती. अर्जुनाने तर केवळ स्वतःची पात्रता सिद्ध केली आणि तुझा विवाह त्याच्याशी झाला. तुझी तरी काय चुकी ? पतीला परमेश्वर मानून ,तू सर्वाधिक प्रेम त्याच्यावरती केलं होतंस. पण आम्हीच मूर्ख .पाच पती असून केवळ अर्जुनावरती सर्वाधिक प्रेम केलं, केवळ म्हणून तुला चुकीचं ठरवलं होतं. तुझे संस्कार आणि तुझी निष्ठा ही तर अपरंपारच.
कारण, पतीने दिलेल्या वचनाखातिर आणि पतीच्या मातेने दिलेल्या आज्ञेखातीर , तू पाच पांडवांशी देखील विवाह केलास.
आज मूर्ख उठवतात प्रश्न यावरतीही. पाच- पाच पतींची पत्नी , यावरून बोलणाऱ्यांच्या मुखातून घाण जरूर वाहते. पण त्यांना कोण सांगणार? तुझ्यासारखी चारित्रवान स्त्री ,ही द्रौपदी तूच ठरलीस.
भर सभेत वेश्या म्हणून सर्वांसमोर तुला संबोधायची देखील हिम्मत झाली आणि त्याच राजदरबारात तुझ्या चारित्र्यावरती ही हात टाकण्याचे महाभयंकर पाप, हे सर्वांसमोरच घडले . इतिहासात त्याला कारण असं सांगतात की, तुझ्या स्वयंवरामध्ये म्हणे तू जातीवरून हिणावल होतस त्या, अंगराज कर्णाला. कोणी आणि कुठल्या पुराणात लिहून ठेवलंय हे माहिती नाही. पण हे मात्र माहिती आहे की, जात नाही तर वर्ण होते त्यावेळेस. मग जातीवरून तू हिणवलंस हे पसरवलं तरी कोणी आणि कसं? द्रोपदी, हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सासू-सासर्‍यांना मातृपित्याचा मान आहे. जर कुंती मातेच्या शब्दाखातीर पाच पांडवांची पत्नी तू झालीस. मग ‘आंधळ्याचा पुत्र’ असे शब्द वापरून धृतराष्ट्र राजाचा अपमान तू केलास, या इतिहासावरती केलास या इतिहासावरती विश्वास ठेवणं आम्हाला शक्यच नाही. पण तरी देखील द्रौपदी नशीबवान होतीस तू . तुझं चारित्र्य वाचवणारा तुझा सखा, गोविंद तुझ्या मदतीला आला. आजही अशा अनेक द्रौपदी समोर येत आहेत. पण द्रोपदी, खंत एकच, की आता मदतीला गोविंद येत नाही. कारण अधर्माच्या राज्यासोबत आज अनेकजण आपल्या पापाचे घडे हे वेगाने भरताना दिसत आहेत.
आज लोक अगदी सहज बोलून जातात. स्त्री मुळे महाभारत घडले. विध्वंस झाला त्यासाठी द्रौपदी तू कारणीभूत होतीस, असं देखील म्हटलं जातं . आणि आज या विचारांची घाण डोक्यात भरून फिरणारे अनेक जण आहेत. पण एका स्त्रीच्या, चारित्र्यावरती हात टाकणाऱ्या पाप्यांना शिक्षा देण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी महाभारत घडलं, हेच नेमकं आम्ही आज विसरलो. आणि पुन्हा त्यामुळेच, रोज एक नवी द्रौपदी समोर येऊ लागली. द्रोपदी, मगाशी मी तुझा सखा गोविंद, असा उल्लेख जरा जाणून बुजूनच केला. कारण एखाद्या स्त्री चा मित्र ही संकल्पनाच मुळात नव्हती. ती , तू आणि गोविंदाने शिकवली. आणि गोविंद आणि द्रौपदीची मैत्री ही अजरामर ठरली. द्रोपदी, तू चारित्र्यवान वीर संयमी आणि आज्ञाधारी देखील होतीस. आणि हाच आदर्श द्यायला, तू पुन्हा जन्म घ्यावा असं वाटतं खरं. पण मनापासून सांगतो द्रौपदी, तू आता पुन्हा जन्म नको घेऊस. कारण, सत्याचा विजय होतो की संकल्पना तुझ्यासोबत केव्हाच निघून गेली. अधर्माच राज्य इथे आता माजल आहे. राजदरबारात तुझ्यावर जी वेळ आली, ती आज चालता फिरता कोणत्या द्रोपदीवर येईल ते माहीत नाहीये, आणि तिच्या नशिबात कोणी गोविंद असेल की नाही, हे देखील आम्हा कोणालाही सांगता येत नाहीये. त्यामुळे या कलियुगात तू खरच येऊ नकोस. आणि द्रोपदी , जरी आलीस तरी तुला हेच सांगेन, की सून द्रोपदी शस्त्र उठाओ अब यहा गोविंद ना आयेंगे ,अब यहा गोविंद ना आयेंगे. ✒️हर्ष सुरेंद्र नागवेकर.. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!