बातम्या

कोकणासाठी पुणे विभागातून गणपतीसाठी तीन विशेष रेल्वे कोकण खेड युवाशक्तीच्या मागणीला यश.

रत्नागिरी : कोकणातील गणेशभक्तांना गावी जाता यावे यासाठी गणेशोत्सव काळात पुणे व मुंबईतून विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाव्यात यासाठी कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष श्री रुपेश मोरे यांनी पत्राद्वारे रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन विशेष रेल्वे गाड्या पुणे विभागाकडून सोडल्या जाणार आहेत यावर्षी पुणे विभागाकडून १५ २२ २९ सप्टेंबरला विशेष रेल्वे गाड्या जातील अशी माहिती देण्यात आली
विशेषतः हि रेल्वे पुणे लोणावळा,पनवेल,रोहा,माणगाव,खेड,चिपळूण,सावर्डे,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,आडवली,राजापूर,वैभववाडी कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकावर थांबणार आहे
पुणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक गाडी क्रमांक ०११६९ पुणे – कुडाळ रेल्वे दिनांक १५ २२ आणि २९ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटेल
तरी सर्व कोकणवासीयांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.. दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!