बातम्या

मंत्री उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि खासदार ए. राजा यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ अटक करा ! – रत्नागिरी येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात मागणी.

      रत्नागिरी – विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणाऱ्या सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स् आणि कुष्ठरोग या रोगांशी तुलना करून सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणारे तामिळनाडूतील द्रमुक या सरकारचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूतील द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.त्यांच्यावर गन्हे नोंद करुन त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे विनय पानवळकर यांनी केली. ते आज जयस्तंभ ,रत्नागिरी येथे झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात बोलत होते.तेपुढे म्हणाले की, तेलंगणा, गुजरात, प्रयागराज, दिल्ली, पंजाब तसेच हरियाणा, मध्य प्रदेश, सिक्कीम या राज्यातील 14 माजी न्यायाधीश, 20 माजी राजदूत, माजी सुरक्षा सचिव, माजी रॉ प्रमुख, माजी विदेश सचिव यांच्यासहित 130 सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, तसेच 118 सेवानिवृत्त सैन्य अधिकारी व्यक्तींनी भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच या सर्वांवरती राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रा.सु.का.) अंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!