बातम्या

भडकंबा, साखरपा येथील जोशी कुटूंबीयांच्या गणपतीचे प्रतिपदेस आगमन.

साखरपा : प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला भडकंबा, साखरपा येथील श्री. प्रविण जोशी यांच्या घरी गणपतीचे शनिवारी आगमन झाले. या गणपतींच्या आगमनाने पंचक्रोशीच्या आणि पर्यायाने कोकणच्या गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. मागील अनेक पिढ्यांपासुन प्रतिपदेला गणपतीचे आगमन होण्याची परंपरा या कुटूंबाने जपली आहे. जोशी कुटूंबीय मुळचे कृष्णा काठच्या कऱ्हाडचे असुन पौरोहित्य करण्याच्या निमित्ताने विशाळगड मार्गे प्रभानवल्ली, साखरपा, देवरुख परिसरात स्थायिक झाले. त्यांपैकी साखरप्यानाजीक भडकंबा येथे अनेक पिढ्यांची गणेशोत्सवाची परंपरा जपणारे श्री. प्रविण जोशी व त्यांचे कुटुंबीय होय. श्री गणपती हे या कुटूंबाचे आराध्य दैवत आहे. जोशी यांच्या देवघरात असणाऱ्या विविध गणेशमूर्तींचे पिढ्यानपिढ्या पुजन केले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते घरगुती गौरी गणपती विसर्जनापर्यंत नऊ दिवसांचा कालावधी असल्याने याला गणपती नवरात्र म्हटले जाते. शनिवारी ब्राम्हवृंदाच्या उपस्थितीत या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेश मूर्तिकार संतोष जामसंडेकर यांचे चित्रशाळेत ही मूर्ती तयार झाली आहे. ज्योतिषी आणि अपभ्रंशाने जोशी आडनाव असलेल्या या कुटूंबावर व समस्त विश्वावरच गणेशाची कृपादृष्टी राहो हीच सदिच्छा श्री. जोशी यांनी व्यक्त करून, गणेशदर्शनाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.

फोटो- १. जोशी यांच्या घरातील स्थापन झालेली श्री गणेश मूर्ती.
२. जोशी घराण्यातील पारंपारिक पंचधातूचा महागणपती. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!