बातम्या

मुंबई सेंट्रल – पाली बससेवा पुर्ववत सुरू करण्याची कोकण एसटी प्रेमी ग्रुपची मागणी..

मुंबई – (प्रमोद तरळ) गेल्या कित्येक वर्षापासून बंद‌ असलेली मुंबई – पाली बससेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष श्री. अपेक्षित‌ कुळये यांनी एसटी महाव्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ‌. ‌
श्री श्रेत्र पाली हे अनेक गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे परंतु मुंबई येथून गाडी सुरू नसल्यामुळे प्रवाशांना व अनेक गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.‌ पुरेशा प्रमाणात प्रवासी वर्ग असून देखील मुंबई सेंट्रल आगार प्रशासना कडून सदर सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा पुन्हा सुरू करुन गणेशभक्त प्रवाशांना दिलासा द्यावा अशा मागणीचे निवेदन कोकण एसटी प्रेमी ग्रुपच्या वतीने एसटीचा महाव्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!