बातम्या

संकल्प सामाजिक संस्था मुंबई आयोजित “संकल्प चषक २०२४” स्पर्धा संपन्न..

मुंबई – (प्रमोद तरळ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने संकल्प सामाजिक संस्था मुंबई आयोजित संकल्प चषक २०२४ ही स्पर्धा ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अग्रवाल मैदान विरार पश्चिम येथे संपन्न झाली.या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील नावलौकीक अशा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे उद्घाटन खेड तालुका रहिवासी मंच मुंबईचे माजी अध्यक्ष आदरणीय नवनाथजी निंबाळकर,किरण जाधव साहेब,संकल्प सामाजिक संस्थेचे सल्लागार वसंत मोरे, राजेंद्र भुवड,विनायक भुवड यांचे हस्ते झाले.संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम उपाध्यक्ष/संजीवनी हॉस्पिटल रूग्णसेवक संदीप खैर,मनोज डाफले, गणेशभक्त कोकणवासीय प्रवाशी संघ मुंबई कार्याध्यक्ष श्री.दिपक चव्हाण, नालासोपारा विभागाचे अध्यक्ष श्री.अजित दौंडेजी, बहिरवली ग्राम विकास मंडळ मुंबई चे सेक्रेटरी संतोषजी भागणे, सल्लागार प्रभाकर जाधव,‌चंद्रकांत कदम (आंबडस),सागर निळू परब, प्रशांत गावडे,अमोल पां.हुमणे (गाव तामनाळे),सुनिल मालप, शाहीर रुपेश मांडवकर, युवाशाहीर महेश डोंगरकर,होम मिनिस्टर उपविजेत्या सिमा ताई भुवड आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता -बाईंगवाडी क्रीकेट संघ,द्वितीय क्रमांक विजेता-जांगलदेव क्रिकेट संघ जानस्करवाडी,तृतीय क्रमांक विजेता-छावा शिवसह्याद्री क्रिकेट संघ गुरव वाडी,चतुर्थ क्रमांक विजेता- यंग ईलेव्हन क्रिकेट संघ कुंभारवाडी. सुदर्शन जाधव (अध्यक्ष), भास्कर आग्रे (उपाध्यक्ष), अनंत पवार (कार्याध्यक्ष), चेतन शिंगरे (सेक्रेटरी), प्रवीण साळुंखे (खजिनदार),युवराज शिंगरे (उपखजिनदार), अविनाश चव्हाण (हिशोब तपासणीस), महेंद्र शिगवण (उप हिशोबतपासणीस),
सल्लागार/मार्गदर्शक -वसंत मोरे,बळीराम जाधव,राजू देसाई, सचिन जाधव, चंद्रकांत मोरे,राजेंद्र भुवड,सदस्य-अनुप गावसकर, शंकर गायकवाड,संजय शिंदे, प्रशांत पवार, सभासद – मनोज मोरे,शरद कदम, अविनाश पाटील,विनायक भुवड,स्वप्निल शिंदे,महेश मासये,श्रीकांत भोसले, ऋषी मोरे,अनिल जंगम, सिद्धी चाळके,प्रणव नाकते,प्रमोद तरल,किशोर ठसाल इत्यादी पदाधिकारी आणि सभासद यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आणि स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.संकल्प सामाजिक संस्था मुंबईच्या वतीने देणगीदार यांचे आभार मानण्यात आले.

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!