दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे शबे मेराज निमित्त इज्तिमा चे आयोजन करण्यात आले होते.शबे मेराज ही मुस्लिम समाजातील एक पवित्र रात असते या रात्री नमाज पठण तसेच,दुवा केली जाते..शबे मेराजच्या रात्री हजरत मोहम्मद पैगंबर यांचे दोन प्रवास झाले पहीला प्रवास मक्का ते अल बैतूल मुखद्स आणि तिकडून सात आसमानांची सफर करत ते अल्लाह च्या समोर आले.इस्लामी मान्यतानुसार मोहम्मद पैगंबर यांनी (ईसवी सन 621 मध्ये प्रवास केला. मुस्लिम धर्मा नुसार हा प्रवास एका वाहनावर झाला त्याचे नाव अल बुराक होते,एकंदरीत, शब ए मेराज हा मुस्लिमांसाठी पैगंबरांच्या प्रवासावर चिंतन करण्याचा आणि इस्लामवरील विश्वास आणि वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्याचा काळ आहे. हे नमाज, दुवा आणि अल्लाहच्या अधीनतेचे महत्त्व आणि क्षमा आणि मार्गदर्शन मिळविण्याची वेळ आहे.या रात्री मुस्लिम धर्मात विशेष दुवा करून, कुराण पठण करून आणि दान आणि दयाळूपणाच्या कृत्यांमध्ये गुंतून शब ए मेराज साजरा करतात. बरेच लोक उपवास करतात, रात्रभर नमाज पठण करतात आणि त्यांच्या पापांची क्षमा मागतात. रात्र हा महान आशीर्वादाचा काळ मानला जातो आणि मुस्लिमांचा असा विश्वास आहे की या वेळी त्यांच्या दुवा आणि विनंत्या स्वीकारल्या जाण्याची अधिक शक्यता असते.
या वेळी प्रवचन (बयान ) अल्ताफ कुरेशी यांनी केले ,तसेच नात पठण अमजद अत्तारी यांनी केले . इज्तिमा नंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले.या वेळी संस्थेचे सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते