बातम्या

पेढांबे श्री सुकाई देवी मंदीर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न.

चिपळूण – (प्रमोद तरळ) दसपटी विभागातील पेढांबे गावी मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व श्री सुकाई, वाघजाई, केदार व काळकाई या देवतांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ फेब्रुवारी रोजी उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
प. पु. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, मठाधिपती सिद्धगिरी कणेरी मठ यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलश पूजन सोहळा कोल्हापूर येथे विधिवत संपन्न झाला. पेढांबे फाटा येथून नूतन मूर्ती व कळसाची भव्य मिरवणूक रविवार दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी संध्यकाळी ५.०० वाजता ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली. रात्रौ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता संकल्प, जुन्या मूर्तीचे पाणी उतरविणे, होमहवन, वास्तु शांती, वास्तु पूजा व देवता निद्रा हे धार्मिक विधी संपन्न झाले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करून रात्रौ १०.०० वाजता देऊळवाडी भजन मंडळ, अलोरे ह.भ.प. श्री प्रविण महाराज आंब्रे यांचे भजन व हरीजागराचे आयोजन करण्यात आले होते.
‌. गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता देवतांना जागविणे, देवतांचे आर्चन, बळीपूजन तसेच सकाळी १०.१५ वाजता नवीन मूर्तीची स्थापना होमहवन करण्यात आले. ह.भ.प. श्री भागवत महाराज भारती, आळंदी देवाची यांच्या शुभहस्ते दुपारी १२.०० वाजता कलश पूजन, प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण विधी पार पडला. तसेच दुपारी १.०० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६.०० वाजता हरीपाठ श्री विठ्ठल भजन मंडळ, पिंपळी व रात्रौ ७.०० वाजता ह.भ.प. श्री भागवत महाराज भारती, आळंदी देवाची यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसाद व रात्रौ ११.०० वाजता नवविकास नमन मंडळ (बाबा गावडे) दत्तवाडी, आंबीटगाव यांच्या नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता मा. श्री. शशिकांतराव गणपतराव शिंदे माजी करनिर्धारक आणि संकलन मुंबई महानगरपालिका यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थान मा. श्री. सुनिलभाऊ गोविंदराव शिंदे आमदार विधान परिषद यांनी भूषविले. सदर समारंभास मा. श्री. विनायकजी राऊत – खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्ग, श्री धनराज पिल्ले, मा. कर्णधार भारतीय हॉकी संघ, मा. श्री. हरिश्चंद्र मधुकरराव शिंदे अध्यक्ष सुकाई देवी देवस्थान ट्रस्ट, श्री सचिन कदम शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख, श्री प्रशांत यादव राष्ट्रवादी नेते, श्री अरुण शिंदे अध्यक्ष दसपटी क्रीडा मंडळ, मा. श्री. मोहन कदम, विश्वास शिंदे, विजय शिंदे प्रतिथयश उद्योजक, इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सदर उद्घाटन सोहळा उत्साहात व आनंदात पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्त व ग्रामस्थ यांनी कठोर परीश्रम घेतले.
‌समाजबांधव, सगेसोयरे, हितचिंतक, देणगीदार व माहोवाशीनींनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली त्या बद्दल श्री सुकाई देवी देवस्थान मौजे पेढांबे सार्वजनिक ट्रस्ट, श्री सुकाई देवी जीर्णोद्धार समिती मुंबई, श्री प्रतापराव गणपतराव शिंदे विशेष निमंत्रक यांनी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.

What's your reaction?

Related Posts

1 of 241

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!