बातम्या

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी रत्नागिरी जिल्हा प्रभारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवलराज काळे यांची नियुक्ती.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी भटके विमुक्त आघाडी जिल्हा कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सर्व तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस उपस्थित असलेले भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गावागावातील धनगर वाड्या भटके विमुक्तांच्या वसाहती यांना भेटीगाठी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना करत. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी भटके विमुक्त आघाडीचे काम अधिक गतीने चालविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री नवलराज काळे यांना रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली.
                नवलराज काळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीचे यशस्वीरित्या काम केले असून त्याचबरोबर त्यांना रत्नागिरी मध्ये देखील लक्ष घालण्याची पक्षाच्या वतीने विनंती करण्यात आली आहे. त्यांची जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती होताच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील भटके विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा आणि आमची टीम कार्यरत राहणार असल्याचे नवलराज काळे आणि सांगितले. जिल्ह्यातील भटके विमुक्तांचे कोणतेही प्रश्न मांडण्यासाठी आपण मला थेट संपर्कही करू शकता असे सांगत त्यांनी आपला संपर्क क्रमांक सार्वजनिक केला आहे. +91 93073 27434.

What's your reaction?

Related Posts

1 of 254

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!