बातम्या

साखरपा किरबेट विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन; विठ्ठलाची सेवा करायला मिळणं हे माझं भाग्य. – श्री विनायक खानविलकर.

प्रतिनिधी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरपा कीरबेट येथील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो विठ्ठल भक्तांनी माऊलींच दर्शन घेत विठ्ठल चरणी आपली सेवा रुजू केली.यादिवशी पाऊस असूनसुद्धा अनेक ठिकाणांहून येणाऱ्या दिंड्यांचा विठ्ठल नामामध्ये तल्लीन होत आनंद ओसंडून वाहत होता.सकाळी विधिवत मंत्रोपचारामध्ये ग्रामस्थांच्या वतीने पूजा करत कार्यक्रमाची सुरुवात झाली .यावेळी आरती भोवती ,प्रदक्षिणा आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत.यावेळी किरबेट गावचे सुपुत्र ऑर्केस्ट्रा स्टार यार कलाकारचे संस्थापक ,जेष्ठ गायक सागर निंबाळकर यांच्या वतीने मंदिरांतील उत्त्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेला मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी आलेल्या रत्नागिरीतील ज्येष्ठ गायकांनी विठ्ठल गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. ऑर्केस्ट्रा स्वरसाईचे संस्थापक , ज्येष्ठ समाजसेवक , निवेदक विनायक खानविलकर यांनी आपल्या कीर्तनरुपी सेवेतून निवेदन करत पांडुरंग चरणी आपली सेवा रुजू केली.यावेळी ऑर्केस्ट्रा स्टार यार कलाकाराचे ज्येष्ठ गायक ,मेकअप आर्टिस्ट नरेशजी पांचाळ ,ज्येष्ठ गायिका आणि रत्नागिरीतील नवलाई भजन मंडळाच्या सर्वेसर्वा सर्वता ताई चव्हाण ,गायक विनयजी नागवेकर , सागर निंबाळकर,प्रतिक निंबाळकर उपस्थित होते.यावेळी बोलताना अभिनेते विनायक खानविलकर म्हणाले , अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक पुरस्कार मिळत गेले.लोकांकडून कामाचं कौतुक होत गेले , पण आज या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतीपंढरपूर समजल्या जाणाऱ्या किरबेट मध्ये आज या पवित्र दिवशी सेवेची संधी मिळाली यापेक्षा दुसरं भाग्य नाही.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!