टॉप न्यूज

रत्नागिरी चे किनारी लाटा का चमकू लागल्या ? पर्यटकांनसाठी पर्वणीच

रत्नागिरी : वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने कोकणामध्ये थंडीची चाहूल लागू लागली आहे. पर्यटकांचे पाय कोकणाकडे फिरू लागले आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळे, पावस, आरे-वारे बीच वरती फिरण्यासाठी येऊ लागले आहेत. अशातच गेले दोन दिवस रत्नागिरीतील काही समुद्रकिनारी लाटा चमकून लागले आहेत. पर्यटकांना या चमकणाऱ्या लाटा आकर्षित करत असून चमकणाऱ्या लाटा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. रत्नागिरी समुद्र दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना या चमकणाऱ्या लाटा म्हणजे जणू पर्वणीच आहे. गेली काही वर्षे ऑक्टोबर नंतर अगदी फेब्रुवारी पर्यंत रत्नागिरीच्या किनार्यांचे हे खास आकर्षण ठरतंय…
         हा फोटो एका युवा छायाचित्रकाराने गणपतीपुळे येथे काढला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असून यामुळे पर्यटक रत्नागिरीकडे वळत आहेत.
          या चमकणाऱ्या किनाऱ्यांमागे काय रहस्य आहे, हे जाणून घेतले असता कळते की “नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो.  खळबळणाऱ्या, उसळणाऱ्या  लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात. नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा प्राणी सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्स सारख्या हिरव्या, निळ्या प्रकाशाने चर्चेत आला आहे. सी स्पार्कल म्ह्णूनही तो ओळखला जातो.
          सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात असून त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या विंटर ब्लूम्स मुळे ! उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुला दरम्यान हे प्राणी मोठ्या प्रमाणात सध्या दिसत आहेत. इतर वेळी लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे आणि दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थर दिसून येत आहे.
         त्याचे कारण म्हणजे या प्राण्याने आपल्या शरीरात पेडीमोनाज नॉकटील्युके या शैवाल वर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न ही प्राप्त करू शकतो. जलचरांची सूक्ष्म पिल्ले, अंडी यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. पण यामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे त्यामुळे यांची संख्या वाढणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे आणि यावर संशोधनही होत आहे.   
    त्याच्या शरीरातील शैवाल पेशी कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करू शकतात. सध्या जगभरात, विशेषतः समशीतोष्ण कटिबंधातील समुद्रात ह्या ब्लूम्स आढळत आहेत. याचा संबंध समुद्रातील अन्न साखळीशी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. यांची संख्या मोठ्या संख्येने वाढणे हे देखील चिंतेचे आहे. म्हणूनच यावर संशोधन करण्याची गरज आहे.
        पण सध्या सुंदर निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटा माणसाला आकर्षित करत आहेत. हे दृश्य खरोखरंच अदभूत आहेत. निसर्गाची ही किमया पाहण्यासाठी लोक रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊ लागले आहेत. आणि या अनुभवाचा आलेख आलेले पर्यटक इतरांना सांगून अनेकांच्या मनातील हे पाहण्याची उत्सुकता वाढवत आहेत. हे वाचून आपल्याही मनातील हे पाहण्याची उत्सुकता नक्की वाढली असेल. *दखल न्यूज महाराष्ट्र.*

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!