टॉप न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल येथे सैनिकांसोबत साजरी करणार आजची दिवाळी.

जम्मू-काश्मीर : संपूर्ण देशामध्ये दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आजचा दिवस कारगिल येथील जवानांसोबत घालवणार असून तेथेच ते दिवाळी साजरी करणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक वर्षी ते आपली दिवाळी सैनिकांसोबत साजरी करत आहेत. आजही ते कारगिल सीमेवर भारतीय लष्कराच्या जवानांसोबत आजची दिवाळी साजरी करत त्यांची परंपरा कायम ठेवत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल येथे पोहोचले आहेत. आणि त्यांनी तेथील भारतीय जवानांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.


2014 साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी साजरी करताना भारतीय सैनिकांबरोबर साजरी करत आहेत, देशाचे प्रमुख कमांडर हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कारगिल येथे उपस्थित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत म्हणून तेथील जवानांमध्ये देखील आनंद पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील प्रत्येक सैनिकांना मिठाई भरवून दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत.

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!