टॉप न्यूज

बेकायदेशीर धंद्यावर चंद़पूर गुन्हे शाखेची नजर?क्रिकेट जुगारातूनच गवसणार कडी…

मूल : क़िकेट मैचवर जुगार खेळणाऱ्यांवर चंद़पूर जिल्हा गुन्हे शाखेने कारवाई उशिरा का होईना केली. मूल शहर क्रिकेट मैच जुगाराचा अड्डा असल्याची ओरड गत अनेक वर्षापासून सुरु आहे. चंद़पूर स्थानिक गुन्हे शाखेला
यांचा गेम करावा लागला. पुढील तपास सुरू आहे. आता चंद़पूर गुन्हे शाखेच्या माध्यमातून तालुक्यातील अवैद्ध धंद्यावर पोलिस मुख्यालयाची नजर राहील अशी कुजबूज सुरु आहे. या कारवाईतून पोलीस प्रशासनाने मनात आणले तर शहरातून चालणारे कित्येक बेकायदेशीर धंदे या मैच जुगाराचे निमित्याने उघड होऊ शकतात अशी चर्चा आहे. नवीन पोलीस अधिक्षक रुजू झाल्यानंतर शहरातून सुरू असलेल्या अनेक बेकायदेशीर धंदयावर टाच येणार अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे. अनेक बेकायदेशीर धंदयापैकी क्रिकेट जुगार उघड झाला आहे.
धाडीनंतर नाना तोडेवार, अझरूद्धीन काझी या 2 आरोपिना अटक तर विजय केशवानी नामक तिसरा आरोपी
फरार आहे. 2 आरोपी ताब्यात आहेतच जर तिसरा गवसला तर चालणाऱ्या अवैद्ध धंद्याची मोठी कडी पोलिसांचे हातात आयती चालून येणार असल्याचे बोलले जात आहे.
बेकायदेशीर सुगंधीत तंबाखू विक़ी, संपुर्ण तालुक्यातून चालणारा जुगार व क़िकेट मैचवर चालणारा सटटा यावर फार मोठी बेकायदेशीर उलाढाल सुरू असल्याची ओरड सुरू
आहे. गत अनेक दिवसांपासून या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याची ओरड सुरू होती. चंद़पूर गुन्हा शाखेने नवीन पोलीस अधिक्षकांचे नेतुत्वात काही अंशी का होईना दिलासा दिला आहे. मात्र क़िकेट मैच जुगारात गवसलेल्या
आरोपींना खाक्या दाखवला तर इतरही बडे बेकायदेशीर धंदयाचे घबाड पोलीसांना गवसणार अशी सगळीकडे चर्चा आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!