देश-विदेश

समग्र रायगड” कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !!

प्रतिनिधी : (अलिबाग : मिथुन वैद्य)

रायगड : जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, जलतरण धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतेच संपन्न झाले
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!