बातम्या

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन..

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकताना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या 'फकीरा' या कादंबरीचे वेगळेपण विशद केले. त्याचबरोबर त्यांचे कथा, कादंबरी, लोकनाट्य, पोवाडे, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य लेखनातून त्यांची सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली. त्याचबरोबर लालबावटा कला पथकाची निर्मिती, कामगार चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, महाराष्ट्राची संयुक्त चळवळ अशा कार्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग याविषयीचे विवेचन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या लेखनातील वास्तवता, मानवता समजून घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले, तर प्रा. प्रवीण जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे, सहाय्यक स्वप्निल कांगणे यांनी मेहनत घेतली.

फोटो- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील, प्रा. सौ. शेट्ये, प्रा. श्री. जोशी. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!