नगरपरिषद प्राथमिक शाळा लाजेंडा येथे सांस्कृतिक व बाल क्रीडा स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा
विजय शेडमाके.
गडचिरोली :- दि.८ फेब्रुवारी *अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे. यामुळे विद्यार्थी या क्षेत्रात पुढे जातात. पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. अभ्यासासोबतच त्यांना क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.* *संत जगनाडे महाराज नगरपरिषद प्राथमिक शाळा लांजेडा येथे सांस्कृतिक व बाल क्रीडा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद्घाटकीय स्थानावरून मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.*
याप्रसंगी लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,माजी नगरसेविका बेबीताई चीचघरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बोधलकर,मुख्याध्यापक रवींद्र पटले,अविनाश कुकुडकर, शिक्षिका सोनिया जुमनाके,सोनाली ननावरे, देवेंद्र नैताम, झाडे,तुळशीदास नैताम, उद्धव नैताम पालक,विध्यार्थी व लांजेडा येथिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.