प्रतिनिधी : डेव्हलपमेंट फाउंडेशन फोर महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्राचा दमदार वक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा गजबजाट अखंड महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. स्पर्धेच्या आयोजनासोबतच स्पर्धेच्या लक्षवेधी ठरणाऱ्या रोख पारितोषिकामुळे ही स्पर्धा फार लक्ष वेधणारी ठरत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रोख रूपये 51 हजार व पारितोषिक असे ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे जिल्हानिहाय फेरी सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई जिल्ह्याची फेरी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी आयोजकांनी दिलेले विषय हे विशेष लक्षणीय आणि अभ्यासपूर्ण ठरत आहे. मुंबई जिल्ह्यामध्ये झालेल्या या फेरीमध्ये कोकण रत्नागिरीचा सुपुत्र हर्ष सुरेंद्र नागवेकर, यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करून स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये स्थान प्राप्त केले. दिलेल्या विषयांपैकी ‘महाराष्ट्राच्या आखाड्यातील खरा पैलवान! ‘ या विषयावरती आपले मत मांडले. विषय मांडत असताना हर्षला एक जनसामान्यातील युवक म्हणून महाराष्ट्राच्या आखाड्यातील खरा पैलवान देवेंद्र फडणवीस साहेब हे वाटतात. म्हणूनच आजपर्यंतदेवेंद्रजी यांनी केलेली कामे, त्यांच्या वरती झालेल्या टीका आणि त्यातूनही त्यांनी स्वतःला कसं सिद्ध केलं व जनतेसाठी जबाबदारीने कार्य करत आहेत याची विस्तारितपणे व अभ्यासपूर्ण पद्धतीने केलेली मांडणी परीक्षकांना अतिशय भावली. या फेरीमध्ये हर्षला पारितोषिक म्हणून रोख रूपये ₹7000/- सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. आपल्या वक्तृत्व शैलीने व अभ्यासपूर्ण मांडणीने हर्ष नेहमीच अशा अनेक स्पर्धांचे विजेतेपद भूषवत असतो, याचा सर्वांनाच अभिमान आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र