रत्नागिरी : दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल अथर्व निवळी येथे भाजपची हातखंबा पंचायत समिती गणाची बैठक विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने , तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. दिनांक 19 ऑक्टोबर रोजीचा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचा दौरा, बूथ कमिटी सक्षमी करण, नवीन मतदार नोंदणी, सरल अँप , संपर्क ते समर्थन आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
बाळासाहेब माने यांनी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली अनुसूचित मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष पिंट्याशेठ निवळकर यांनी निवळी गावाच्या विकासाबाबत निवेदन केले तर युवा नेतृत्व निरंजन जठार व तालुका चिटणीस महेश खानविलकर यांनी हातखंबा गावातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली बाळासाहेब माने यांनी आपणास विकास निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासित केले.
या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने, तालुका अध्यक्ष दादा दळी, तालुका उपाध्यक्ष विजय गावडे, तालुका चिटणीस महेश खानविलकर, अनुसूचित जाती / जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष पिंट्याशेठ निवळकर, ग्रामपंचायत सदस्य हातखंबा निरंजन जठार, विवेक मुळे, संजय जोशी, विष्णू पेजे, अथर्व केळकर, संजय केळकर, पाल्ये.कोकजे गुरुजी आधी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.