अध्यात्म/राशी भविष्य

राशी भविष्य(३ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आज आपला खर्च वाढू शकतो. खऱ्या प्रेमाची अनुभूती येईल आई-वडिलांकडून तुमच्या जोडीदाराला काहीतरी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.
➡️ वृषभ : अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस आहे. खरेदी करताना निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आज तुमच्या आर्थिक योजना सफल होतील.
➡️ मिथुन : आज तुमच्याकडे तुमच्या आरोग्यासाठी वेळेत असेल. आज तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवणे चांगले राहील. तुम्ही घेतलेली मेहनत यशस्वी होईल. तुमच्या भावंडांसोबत तुम्ही वेळ घालवाल.
➡️ कर्क : आज तुम्हाला योग्य असा सल्ला मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही सक्षम व्हाल. ताण-तणाव, वाद-विवाद यापासून दूर राहा अन्यथा त्याचा परिणाम घरातील सुख शांती वर होऊ शकतो. तुमच्याकडं कोणती चूक झाल्यास त्याची भरपाई करावी लागेल.
➡️ सिह:- माझे तेच खरे या अविर्भावात राहू नका. ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. नोकरदार लोकांना त्यांचे कोणतेही लक्ष पूर्ण करण्यात यश मिळेल. घरातील वातावरण उत्तम राहील एखाद्या शारीरिक व्याधीचा त्रास काही काळ जाणवू शकतो. आराम करा आज तुम्ही खुश राहणार आहात.
➡️ कन्या : अध्यात्मिक गोष्टींमध्ये आज आवड निर्माण होईल. तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये कोणालाही ढवळाढवळ करू देऊ नका. घरातील व्यक्तींना अवश्य मदत करा मार्केटिंग क्षेत्रात आज काही काळ वाया जाईल.
➡️ तुला : तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला लाभ होणार आहे. मात्र त्यांना तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे. एकमेकांबरोबर आदर ठेवा. संतुलित आहार घ्या. कोणत्याही कारणाने काहीसा तणाव जाणवल्यास काही काळ शांत बसा.
➡️वृश्चिक : नोकरी व्यवसायात उत्तम यश मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला उत्तम फळ मिळेल. घरामध्ये देखील सुख आणि शांती लाभेल.
➡️धनु : वकिली क्षेत्रात मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरदार व्यक्ती त्यांच्या कामात व्यस्त राहतील आज अडचणी येतील मात्र त्या आपण दूर कराल. प्रेम प्रकरणात कमालीचे सावध रहा. आरोग्य उत्तम राहणार आहे.
➡️ मकर : मित्रमंडळींकडून तुमची प्रशंसा होईल. आज तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता. तुम्ही आनंदाने राहण्याने घरातील वातावरण देखील चांगले राहणार आहे. आजचा दिवस चांगला आहे, हे तुम्ही स्वतः अनुभवणार आहात.
➡️ कुंभ : तुमच्या व्यवसायातील कोणतेही रखलेले काम सुरू केल्यास ते पूर्ण होईल. आर्थिक समस्या दूर होतील. आज नवीन कामाचे नियोजन करणे योग्य नाही, हातातले काम पूर्ण करा. विवाह बाह्य प्रेम संबंधांपासून दूरच रहा.
➡️ मीन : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे. सहकाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायात आज अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत काळजी घ्या प्रेम प्रकरणात वेळ वाया घालू नका. अपचनाची समस्या जाणवू शकते.      
*दखल न्यूज महाराष्ट्.*

What's your reaction?

Related Posts

1 of 246

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!