अध्यात्म/राशी भविष्य

राशी भविष्य(८ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : अनोळखी व्यक्तीबरोबर भेटताना थोडे सावध राहा. पैसे येण्याबरोबरच खर्चही वाढतील. प्रॉपर्टी संदर्भात खरेदी करणारअसाल तर सावधगिरी बाळगा. भविष्यामध्ये नियोजित केलेल्या कामावर काम करत राहणे उचित राहील.
➡️ वृषभ : आजचा दिवस सकारात्मक आणि ऊर्जा असणारा असणार आहे. घरामध्ये काहीतरी मंगल कार्य घडेल. तुम्ही ठरवलेले काही गोष्टी जाहीर करू नका त्यामुळे त्यामध्ये अडथळा येऊ शकतो.
➡️ ​मिथुन : मिथुन राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस अतिशय सुंदर असणार आहे राजकारणातील चांगले क्षण अनुभवता येतील. मागे घडलेली एखादी निगेटिव्ह गोष्ट आज तुम्हाला त्रास देऊ शकते. विद्यार्थ्यांनी आज आपल्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
➡️ कर्क : अनुभवी व्यक्तींबरोबर आजचा दिवस चांगला जाईल धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्या हिताचे असेल वैवाहिक जीवनात सन्मान मिळेल. नोकरी व्यवसाय एखादा चांगला संदेश प्राप्त होईल.
➡️ सिंह : आनंद वार्ता कळाल्याने तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही खुश आणि ऊर्जावान असणारा आहात. प्रेमात होता अशा एखाद्या व्यक्तीची आठवण येईल. वैवाहिक जीवन देखील आज चांगले असणार आहे. बाहेरील खाणे टाळा.
➡️ कन्या : आज तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असणार आहात. व्यवसायात सुधारणा होईल. घरचे वातावरण उत्तम असणार आहे प्रिय मित्रां बरोबर भेटीसाठी होती त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.
➡️ तुळ : कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. कोणाशीही बोलताना वाणीमध्ये मधुरता ठेवा. इतर कोणाच्याही कामात हस्तक्षेप करणे टाळा.
➡️वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही जेवढे मेहनत घ्याल त्याचे फळ तुम्हाला मिळणार आहे. मार्केटिंग संबंधी काही काम असेल तर ते थांबू शकते.
➡️धनु : आज तुम्हाला चांगले क्षण अनुभवता येतील भविष्यात लाभदायक असणाऱ्या घटना आज घडतील. आज तुम्ही खरेदी करू शकता. खर्च वाढण्याने काहीशी चिंता जाणवेल. व्यवसायात कोणतीही रिस्क घेऊ नका.
➡️ मकर : तुम्ही तयार केलेल्या योजनेप्रमाणे काम करत राहा आज काहीतरी चांगली घटना घडेल. सुख शांती लाभणार आहे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जमीन विषयी काम करत असताना काळजीपूर्वक करा.
➡️ कुंभ : तुमच्या कामात तुम्ही काहीसे व्यस्त असाल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आत्मविश्वास ठेवणे गरजेचे आहे. तुमची लोकप्रियता वाढेल घरामध्ये काहीतरी समस्या जाणवू शकते पैशासंबंधी गोष्टीत सतर्क राहून निर्णय घ्या.
➡️ मीन : अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस असणार आहे. समजदारीने काम केलात तर काहीतरी हाती लागू शकते. प्रॉपर्टी जमीन संदर्भात निर्णय तुमच्या बाजूने येईल. सहकाऱ्यांची चांगली साथ आज तुम्हाला मिळणार आहे. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही चांगले असणार आहात.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्.

What's your reaction?

Related Posts

1 of 246

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!