बातम्या

तुकाराम जाधव राजापूर पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारी

राजापूर – (प्रमोद तरळ)
राजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी तुकाराम जाधव यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी गटविकास अधिकारी पदाचा पदभारही स्विकारला असून त्यांचे पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून स्वागत करण्यात आले. पंचायत समितीमध्ये यापूर्वी गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विवेक गुंड यांची अन्यत्र बदली झाल्याने गटविकास अधिकारी पद रिक्त राहीलेले होते. त्या जागी आता श्री. जाधव यांची नियुक्ती झाली आहे. श्री. जाधव यांनी यापूर्वी गुहागर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. 

What's your reaction?

Related Posts

1 of 246

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!